प्रयागराज – सलग २ दिवस असलेल्या सुटीच्या पार्श्वभूमीवर येथे प्रचंड गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन बाहेरील वाहनांना पोलिसांकडून कुंभक्षेत्रात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मौनी अमावस्येच्या दिवशी अमृत स्नानासाठी १० कोटी भाविक येण्याचा अंदाज प्रशासनाने वर्तवला आहे. २५ जानेवारीला शनिवार आणि २६ जानेवारीला रविवार, तसेच प्रजासत्ताकदिन आहे. या सुट्या जोडून आल्याने प्रयागराज येथे प्रचंड गर्दी होण्याचा अंदाज पोलीस आणि प्रशासन यांनी वर्तवला आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. बाहेरील वाहनांसाठी ठिकठिकाणी पार्किंगचे ठिकाण निश्चित करण्यात आले आहे. शहरातील लोकांसाठीही पार्किंगचे ठिकाण निश्चित करण्यात आले आहे.