Naga Sadhu Andolan : आखाड्यात पाणी शिरल्याने आवाहन आखाड्याच्या नागा साधूंनी केले रस्ता बंद आंदोलन !

प्रयागराज (उत्तरप्रदेश), २४ जानेवारी (वार्ता.) – प्रसाधनगृहासाठी असलेली नळजोडणी तुटून आखाड्यामध्ये पाणी शिरल्याने आवाहन आखाड्याच्या नागा साधूंनी ‘सेक्टर १९’मध्ये मोरी-मुक्ती चौकात २३ जानेवारीच्या रात्री रस्ता बंद आंदोलन केले. चौकाच्या मध्यभागी लाकडी पलंग टाकून नागा साधूंनी हा चौक पूर्णपणे बंद केला. अचानक रात्री रस्ताबंद झाल्याने चारही मार्गांवरून येणारी वाहतूक थांबली आणि चौकात भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. थोड्याच वेळात पोलीस अधिकारी घटनास्थळी येऊन त्यांनी पुढील २ घंट्यांत पाण्याच्या समस्येवर उपाययोजना काढण्याचे आश्‍वासन देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर नागा साधूंनी आंदोलन मागे घेतले.