Attacks On Hindu Temples In Bangladesh : बांगलादेशात जिहादी मुसलमानांकडून हिंदूंच्या २ मंदिरांची जाळपोळ !

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील गोपाळगंज जिल्ह्यातील काशियानी उपजिल्ह्यातील तारैल नॉर्थपारा गावातील दुर्गा मंदिर आणि शितला मंदिर २१ जानेवारी या दिवशी सकाळी जिहादी मुसलमानांकडून जाळण्यात आले. या वेळी श्री शितलादेवीची मूर्ती फोडण्यात आली. या घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. –  संपादक)

काशियानी पोलीस ठाण्याचे अधिकारी महंमद शफिउद्दीन खान म्हणाले की, आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत; परंतु आतापर्यंत कुणीही तक्रार नोंदवलेली नाही किंवा आरोपींची ओळख पटलेली नाही. या घटनेची गांभीर्याने चौकशी केली जाईल.

संपादकीय भूमिका

बांगलादेशात कुणीही निधर्मी, पुरोगामी अथवा धर्मनिरपेक्षतावादी नाही. त्यामुळे पीडित हिंदूंच्या बाजूने कुणीच उभे रहात नाही, तर भारतात या सर्वांचा सुळसुळाट आहे आणि ते येथेही पीडित हिंदूंच्या बाजूने नाही, तर धर्मांध मुसलमानांच्या पाठीशी नेहमीच उभे रहातात !