तुर्भे येथील ‘संकल्प सामाजिक संस्थे’च्या वतीने एस्.एस्.सी. व्याख्यानमाला !

नवी मुंबई – तुर्भे येथील ‘संकल्प सामाजिक संस्थे’च्या वतीने एस्.एस्.सी. व्याख्यानमाला भरणे येथे आयोजित करण्यात आली होती. संस्थेचे अध्यक्ष अशोक सकपाळ यांनी प्रास्ताविकात मागील ३० वर्षांपासून ग्रामीण भागात चाललेल्या शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमाचा थोडक्यात आढावा घेतला. ही व्याख्यानमाला आयोजित करण्याचे संस्थेचे हे सलग दहावे वर्ष आहे.

या कार्यक्रमास नवी मुंबईतील सी.ए.एम्. शेट्टी, ईशा बर्थवाल, नवी मुंबई महापालिकेचे एम्.आर्.ओ. डॉ. राजेश ओतुरकर, गटशिक्षणाधिकारी व्हि.डी. बाईत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी संस्कार मर्चेडे आणि सार्थक मोरे यांनी छत्रपती संभाजी महाराज मिलिटरी स्कूलच्या वतीने, तर स्वार्था जंगम, जीवक कांबळे यांनी तळे हायस्कूल यांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. तालुक्यातील एकूण १९ शाळांच्या शेकडो विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला. कैलास चव्हाण, संजय मोहिते, सुभाष जगताप या तज्ञ शिक्षकांनी गणित, सायन्स आणि इंग्रजी या विषयांवर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी विक्रांत सकपाळ, रूपेश तांबट, शुभम जाधव, सिद्धेश सकपाळ आदी स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.