
पुणे – राजस्थानातून अफू विक्रीसाठी घेऊन आलेल्या नाथूराम जाट याला अमली पदार्थ विरोधी पथकाने कोंढवा भागात पकडले. त्याच्याकडून २१ लाख ८० सहस्र रुपयांची १ किलो ९० ग्रॅम अफू जप्त करण्यात आली. जाट याच्याविरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. झटपट पैसे कमावण्यासाठी त्याने राजस्थानातून अफू विक्रीस आणली होती. पोलिसांकडून अन्वेषण चालू आहे.