Zoho CEO On IIT Madras Director Statement : गोमूत्रात औषधी गुणधर्म असल्याच्या ‘आय.आय.टी. मद्रास’च्या संचालकांच्या विधानाला ‘झोहो’ आस्थापनाच्या प्रमुखाचे समर्थन

(आय.आय.टी. म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी – भारतीय तंत्रज्ञान संस्था)

‘आय.आय.टी. मद्रास’चे संचालक व्ही. कामकोटी व ‘झोहो’ आस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर वेम्बू

नवी देहली – ‘आय.आय.टी. मद्रास’चे संचालक व्ही. कामकोटी यांनी गोमूत्रात औषधी गुणधर्म असल्याच्या केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला असतांना ‘झोहो’ आस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर वेम्बू यांनी व्ही. कामकोटी यांचे समर्थन केले आहे.

वेम्बू यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की,

१. आय.आय.टी. मद्रासचे संचालक प्रा. कामकोटी एक आदरणीय संशोधक आणि शिक्षक आहेत. त्यांनी गोमूत्राच्या लाभांवर आधारित वैज्ञानिक संशोधनाची उदाहरणे दिली आहेत. आधुनिक विज्ञानाला आता हिंदूंच्या पारंपरिक ज्ञानाचे महत्त्व समजू लागले आहे; पण ऑनलाईन टीकाकार केवळ त्यांचे पूर्वग्रह दाखवत आहेत, ज्यांना कोणताही वैज्ञानिक आधार नाही. प्रा. कामकोटी, खंबीर रहा. या टीकेपुढे झुकण्याची आवश्यकता नाही.

२. आतड्यांतील जीवाणू मानवाच्या रोगप्रतिकारक शक्तीचा एक महत्त्वाचा भाग आहेत आणि मनुष्याच्या शारीरिक अन् मानसिक आरोग्यात ते मोठी भूमिका बजावतात. म्हणून गोमूत्र आणि शेणाचे लाभदायक गुणधर्म ही अंधश्रद्धा नाही. आधुनिक विज्ञानही आता यावर सहमत होऊ लागले आहे.