‘मनीएज’ आस्थापनाकडून ३ सहस्र गुंतवणूकदारांची फसवणूक

मुंबई – ‘मनीएज’ आस्थापनाकडून ३ सहस्र गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे. मुलुंड पोलीस ठाण्यात एका गुंतवणूकदाराने या संदर्भात तक्रार केल्यावर आस्थापनाच्या ४ मालकांपैकी वेणू गोपाल आणि रावराणे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (अशा प्रकारचे फसवणूक करणारे आस्थापन निर्माणच होणार नाही यासाठी सरकार कोणती उपाययोजना करणार आहे ? – संपादक)

वर्ष २०११ मध्ये हे आस्थापन स्थापन करण्यात आले. या आस्थापनाने ९ पासून २४ टक्के व्याजदर देण्याचे प्रलोभन आणि आमिष दाखवून अनेक गुंतवणूकदारांना त्यांच्या योजनांमध्ये पैसे गुंतवणे भाग पाडले. अधिक परतावा देण्याच्या गुंतवणुकीच्या विविध योजना त्यांनी राबवल्या.

कांदिवली येथील राहुल पोतदार ऑगस्ट २०२४ मध्ये त्यांच्या नातेवाइकांची २ कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली होती. एकूण १०० कोटींपेक्षा अधिक पैशांची अफरातफर केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संदर्भात अनेक गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे आणि मुलुंड पोलीस यांच्याकडे तक्रारी नोंदवल्या आहेत.