अमली पदार्थांची बजबजपुरी झालेला महाराष्ट्र !

कल्याण – भुवनेश्वर एक्सप्रेसमधून प्रवास करत असतांना तिकीट तपासनिसाने एका प्रवाशाला प्रवासाचे तिकीट विचारल्यावर त्यांच्याजवळ तिकीट नसल्याने तपासनिसाने त्या प्रवाशाला कह्यात घेतले. अंबरनाथ रेल्वेस्थानक आल्यानंतर त्याला कल्याण रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांच्या कह्यात दिले. पोलिसांना या प्रवाशाचा संशय आला; म्हणून त्यांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ ३ किलो गांजा आढळून आला.
एक्सप्रेसमध्ये विनातिकीट प्रवास करत हा प्रवासी धाडसाने अमली पदार्थ घेऊन जात होता. कल्याण रेल्वेस्थानकात या प्रवाशाला अमली पदार्थांसह उतरवण्यात आले. तेथे त्याला कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणण्यात आले. हा तरुण उच्चशिक्षित कुटुंबातील एक उच्चशिक्षित सदस्य असून रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील मोहपाडा येथील रहिवासी असल्याचे पोलीस अन्वेषणात उघड झाले. (उच्चशिक्षित तरुण अशा मार्गाकडे वळणे समाजासाठी दयनीय ! – संपादक) या प्रवाशाच्या चौकशीतून गांजा तस्करांची टोळी उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.