परशुराम हिंदु सेवा संघाची राज्य कार्यकारिणी बैठक पुणे येथे पार पडली !

बैठकीला उपस्थित पदाधिकारी

पुणे – परशुराम हिंदु सेवा संघाची राज्य कार्यकारिणी बैठक १९ जानेवारीला येथील नारद मंदिर सभागृह येथे पार पडली. या वेळी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अनिल मुळे, प्रदेशाध्यक्ष श्री. विश्वजीत देशपांडे, महिला अध्यक्षा डॉ. संजीवनी पांडे आदींची उपस्थिती होती. बैठकीत संघटनेच्या पुढील काळातील उपक्रमांविषयी चर्चा करण्यात आली. सर्व जातीय व्रतबंध सोहळा आयोजित करणे, देवस्थान इनाम भूमी असलेल्या बाधित शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी चालू असलेल्या आंदोलनाला अजून तीव्र रूप देणे अशा प्रमुख गोष्टींवर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. या वेळी राज्यातील विविध ठिकाणच्या बांधवांची संघटनेच्या पदांवर निवड करण्यात आली.

महाराष्ट्र राज्याच्या बजेट अधिवेशनापूर्वी देवस्थान इनाम भूमीसंदर्भात सकारात्मक निर्णय न आल्यास संघटनेच्या वतीने पुणे ते मुंबई मोर्चा काढण्यात येईल. त्यात या विषयाने बाधित असलेले ज्येष्ठ नागरिक उपस्थित असतील, अशी चेतावणी संघटनेच्या वतीने प्रदेशाध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांनी दिली.