Maha kumbh Fire Breakout : कुंभक्षेत्री आग लागून २५ तंबू जळून खाक, अनेक सिलिंडरचे स्फोट !

कुंभक्षेत्री आग लागून २५ तंबू जळून खाक, अनेक सिलिंडरचे स्फोट !

प्रयागराज, १९ जानेवारी (वार्ता.) – महाकुंभक्षेत्री येथील सेक्टर १९ मधील रेल्वे पुलाच्या खाली असलेल्या तंबूमध्ये भीषण आग लागली. यामध्ये २०-२५ तंबू जळून खाक झाले, तसेच आगीमुळे तंबूत ठेवलेल्या सिलेंडर्सचे एका मागून एक स्फोट झाले. अग्नीशमन दलाच्या सैनिकांनी आगीवर पाणी ओतून आग आटोक्यात आणली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही आग पहाण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती. तंबूंना आग लागल्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.