मुरादाबादमध्ये एका हिंदु मुलीवर चालत्या कारमध्ये बलात्कार : रशीदला अटक !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुरादाबाद – उत्तरप्रदेशच्या मुरादाबादमध्ये एका १६ वर्षीय हिंदु मुलीचे अपहरण करून तिच्यावर चालत्या कारमध्ये बलात्कार करण्यात आला. आरोपींनी पीडित अल्पवयीन मुलीवर सतत २ घंटे लैंगिक अत्याचार केले. नंतर तिला शेजारच्या पानुवाला गावाबाहेरील शेतात फेकून पळ काढला. पीडित मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवून रशीद नावाच्या आरोपीला अटक केली. पीडित मुलीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. आरोपी रशीदची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत. (हिंदु नेते योगी यांची सत्ता असलेल्या उत्तरप्रदेशमध्ये मुसलमान तरुण हिंदु मुलींचे अपहरण करून त्यांच्यावर बलात्कार करण्याचे धाडस करतात. यावरून वासनांध जिहाद्यांवर वचक बसवण्यासाठी प्रशासन अल्प पडते कि काय, असा प्रश्न सर्वसामान्य हिंदूंना पडू शकतो ! – संपादक)

१. पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, १४ जानेवारी या दिवशी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास त्यांची मुलगी घरातील कचरा गोळा करून गावाबाहेर टाकण्यासाठी जात होती. तेवढ्यात वाटेत एक चारचाकी स्कॉर्पिओ गाडी तिच्याजवळ थांबली. स्कॉर्पिओतून खाली उतरलेल्या तरुणाने तिला बलपूर्वक गाडीत घातले आणि तिला गाडीतून सोबत नेले.

२. आरोपी तरुणाने चालत्या कारमध्ये पीडित मुलीवर पाशवी बलात्कार केला. तिची छायाचित्रे घेतली आणि व्हिडिओही बनवला. गाडीत एका आरोपीचे भेटकार्ड होते. त्यावरून मुलीला एका आरोपीचे नाव रशीद असून तो ठाकूरद्वारचा रहिवासी असल्याचे कळले.

३. पोलीस अधीक्षक कुंवर आकाश यांनी सांगितले की, या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी रशीदला अटक केली आहे. त्याची चौकशी करण्यात येत आहे. त्याच्या अन्य काही साथीदारांचाही या घटनेत सहभाग असल्याचे समोर आले आहे. या सर्वांना पोलीस अटक करणार आहेत.