
‘संपूर्ण जगावर स्वतःचेच प्रभुत्व असले पाहिजे’, या राक्षसी महत्त्वाकांक्षेने प्रेरित झालेल्या ‘डीप स्टेट’, सांस्कृतिक मार्क्सवाद, जिहादी इस्लाम यांच्या आघाडीने भारताविरुद्ध ‘अघोषित युद्ध’ पुकारले आहे. बांगलादेशासारखा भारताचा घास पटकन घेता येणार नाही, हे ओळखून कधी नागरिकत्व सुधारणा कायदा, कधी शेतकरी आंदोलन, कधी हिंडेनबर्ग, तर कधी मणीपूर असे विषय पेटवून ते भारताला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असतात. काँग्रेसचे राहुल गांधी हे या आघाडीच्या हातातील खेळणे असल्यामुळे ते या प्रत्येक प्रयत्नात हिरिरीने सहभागी होतात. ‘आमची लढाई ‘इंडियन स्टेट’ (भारतीय संघराज्य) विरुद्ध आहे’, असे सांगून त्यांनी हे सत्य उघड केले इतकेच !
– श्री. अभिजित जोग, प्रसिद्ध लेखक, पुणे. (१६.१.२०२५)