मोठा शस्त्रसाठा जप्त
जगदलपूर (छत्तीसगड) – सुरक्षादलांनी छत्तीसगड आणि तेलंगाणा यांच्यातील सीमेवर केलेल्या कारवाईत १२ नक्षलवाद्यांना ठार केले, तर २ सैनिक घायाळ झाले. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडला. १ सहस्र ५०० सैनिकांनी या परिसराला घेराव घालून ही कारवाई केली.
12 Naxalites killed on the Chhattisgarh-Telangana border.
Large cache of weapons seizedpic.twitter.com/Lk60VYku5f
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 17, 2025
१६ जानेवारीला सकाळपासून ही चकमक चालू होती. सायंकाळी उशिरा नक्षलवाद्यांना ठार करण्यात यश मिळाले. काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांनी पेरलेल्या भूसुरूंगाच्या स्फोटामुळे ८ सैनिकांना वीरमरण आले होते. त्यानंतर सुरक्षादलांनी आता याचा सूड उगवल्याचे म्हटले जात आहे.