रामायण आणि महाभारत यांवर आधारित परीक्षेत २ लाख विद्यार्थ्यांचा सहभाग !

संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम !

मुसलमान आणि ख्रिस्ती धर्मीय विद्यार्थ्यांचा लक्षणीय सहभाग

मुंबई – संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ यांच्यावर आधारित परीक्षा १६ जानेवारी या दिवशी आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतील २ सहस्रांहून अधिक शाळांमधील २ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेत सहभाग घेतला होता. परीक्षेच्या नियोजनासाठी ३ सहस्र स्वयंसेवकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला होता. या परीक्षेत मुसलमान आणि ख्रिस्ती धर्मीय विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय होता. यातील अनेक विद्यार्थी सुवर्णपदकाचे मानकरी ठरले.

१. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण खात्याने घोषित केलेल्या ‘आनंदी शनिवार’ या संकल्पाच्या अंतर्गत रामायण, महाभारत आणि संतांच्या कथा विद्यार्थ्यांना सांगितल्या जातात. या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ६० गुणांच्या वस्तूनिष्ठ परीक्षेचे आयोजन करण्यात येते.

२. परीक्षेतील गुणांच्या आधारावर प्रत्येक इयत्तेच्या प्रथम क्रमांकाला सुवर्णपदक देऊन गौरवण्यात येते.

३. शालेय विद्यार्थ्यांना रामायण आणि महाभारत यांची ओळख व्हावी, भारतीय जीवनमूल्यांचे संचित आजच्या पिढीसमोर जावे, या हेतूने गेली २१ वर्षे हा संस्कार यज्ञ चालू आहे.

संपादकीय भूमिका :

‘रामायण’ आणि ‘महाभारत’ हे हिंदूंचे धर्मग्रंथ असूनही हिंदूंपेक्षा अन्य धर्मियांचा यात लक्षणीय सहभाग असणे हे हिंदूंना लाजवणारे नाही का ?