मुंबई महापालिकेने ३ वर्षे औषध खरेदीच्या निविदा काढल्या नाहीत !

कोट्यवधींची हानी झाल्याचा आरोप !

मुंबई महानगरपालिका

मुंबई – महापालिकेने गेल्या ३ वर्षांत निविदा न काढता औषधांची खरेदी केली. त्यात १ रुपयाला मिळणारे औषध १० रुपयाला खरेदी केले गेले. यामुळे महापालिकेला ५० ते ६० कोटी रुपयांची हानी झाली आहे. पालिकेची चिकित्सालये आणि रुग्णालये येथे पुरवठा करणार्‍या औषधांच्या दर करारपत्राची मुदत ४ वर्षांपूर्वी संपल्यानंतर नवीन करारपत्र करण्यात आले नाही. ‘फूड अँड ड्रग लायसन्स होल्डर फाऊंडेशन’चे अध्यक्ष अभय पांडे यांनी वरील आरोप केला आहे. या संदर्भात पांडे यांनी म्हटले आहे की, पालिकेची ‘झिरो प्रिस्किप्शन पॉलिसी’ (रुग्णाला औषधे खरेदीसाठी आधुनिक वैद्यांकडून दिली जाणारी सूची न देण्याचे धोरण) कागदावरच राहिली आहे.

‘पुरवठादारांनी दिलेल्या पत्रात याविषयीची माहिती नसल्याने याविषयी काही सांगता येणार नाही’, असे महापालिकेच्या आरोग्य उपायुक्तांनी या संदर्भात म्हटले आहे.

संपादकीय भूमिका :

  • ३ वर्षे औषध खरेदीच्या निविदा न काढता खरेदी केल्यामुळे झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या हानीचे दायित्व कोण घेणार ?
  • मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार संपवण्यासाठी कुठलेच शासन आणि प्रशासन प्रयत्न करत नाही, हे लक्षात घ्या !