कामाची माहिती भरण्याच्या ‘ॲप’मुळे मुंबई महापालिकेचे अभियंते अप्रसन्न !

मुंबई महानगरपालिका

मुंबई – महापालिकेच्या विभाग कार्यालयाच्या विविध खात्यांमध्ये साहाय्यक अभियंत्यांच्या कामात पारदर्शकता यावी, यासाठी प्रशासनाने ‘पी.आ.एस्.’ यंत्रणेवर एक ‘ॲप’ विकसित केले आहे. प्रत्यक्ष कार्यस्थळी केलेल्या कामांची माहिती या ‘ॲप’मध्ये भरण्याची सूचना अभियंत्यांना करण्यात आली आहे; मात्र कर्मचारी या व्यवस्थेविषयी अप्रसन्न आहेत.

परीरक्षण आणि रस्ते, घनकचरा व्यवस्थापन, इमारत आणि कारखाने आदी विभागांमध्ये कार्यरत साहाय्यक अभियंता आणि विभाग अधिकारी (‘बीट ऑफिसर’) यांनी केलेल्या कामात पारदर्शकता यावी आणि कामाचा दर्जा राखला जावा, यासाठी या ‘ॲप’ची निर्मिती करण्यात आली आहे. हा निर्णय एकतर्फी घेतल्याचे ‘म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशन’ या अभियंत्यांच्या संघटनेचे म्हणणे आहे.

संपादकीय भूमिका :

  • कामाचा समन्वय रहावा आणि काम केल्याचे लक्षात यावे, यासाठी केलेली ही उपाययोजना व्यवस्थापनाच्या दृष्टीने अत्यावश्यक असल्याने कर्मचार्‍यांनी उलट त्याविषयी समाधानी असले पाहिजे; मात्र कामचुकार आणि कर्तव्यच्युत कर्मचारी याविषयी अप्रसन्न होतील, यात नवल ते काय ?
  • असे कर्मचारी देशाला महासत्ता बनवण्यात अडथळेच ठरणार नाहीत का ?