Prayagraj Mahakumbh 2025 : महाकुंभनगरीत आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींनी केले त्रिवेणी संगमात स्नान !

प्रयागराज कुंभपर्व २०२५

त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी आलेले आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचे शिष्टमंडळ

प्रयागराज : आज कुंभनगरीत आलेल्या १० देशांच्या २१ सदस्यांनी त्रिवेणी संगमात स्नान केले. या वेळी या २१ सदस्यांनी कुंभनगरीतील विविध आखाड्यांना भेट दिली. तेथे साधू-संतांची आध्यात्मिक विषयांवर चर्चा केली. साधू-संतांनी या प्रतिनिधींनी महाकुंभपर्वाचे ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व यांविषयी माहिती दिली.

या प्रतिनिधींमध्ये फिजी, गयाना, फिनलँड, मलेशिया, मॉरीशस, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, त्रिनिदाद आणि टोबॅगो अन् संयुक्त अरब अमिरात या देशांतील प्रतिनिधींचा समावेश आहे. या प्रतिनिधींचे टिळा लावून स्वागत करण्यात आले.

या प्रतिनिधींनी सांगितले की,

महाकुंभ जगाला एकतेचा संदेश देत आहे. भारतीय संस्कृती पहाण्ो आणि ती समजून घेणे, यांसाठी सर्व देशांतील लोकांनी या महाकुंभनरीत आले पाहिजे. हे जगातील सर्वांत मोठे आयोजन आहे. महाकुंभाच्या आयोजनाने सर्वच प्रतिनिधी प्रभावित झाले आणि त्यांना भारतीय संस्कृतीची महानता लक्षात आली.