
१. आई-वडिलांच्या भावपूर्ण नामजपामुळे पोळीवर ॐ सारखी आकृती उमटल्याची साधिकेला जाणीव होणे
‘१६.६.२०२४ या दिवशी माझ्या आईला (सौ. क्षिप्रा श्याम देशमुख, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ७० वर्षे यांना) त्रास होत असल्यामुळे श्रीमती मीरा करी (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ६७ वर्षे) यांनी आईला ३ घंटे ॐ चा नामजप करायला सांगितला होता. त्यानुसार माझे आई आणि बाबा (श्री. श्याम देशमुख, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७३ वर्षे) सकाळी ११ वाजता नामजप करत होते. त्या वेळी मी पोळ्या करत होते. सर्व पोळ्या झाल्यावर माझ्या लक्षात आले, ‘एका पोळीवर ॐ सारखी आकृती उमटली आहे. लगेच माझ्या मनात विचार आला, ‘आई-बाबा भावपूर्ण नामजप करत असल्यामुळे पोळीवर ॐ ची आकृती उमटली आहे.’

२. विद्युतकळ चालू असूनही न फिरणार्या पंख्यातून ॐ चा ध्वनी ऐकू येणे
मी बाबांना पोळीवर ॐ ची आकृती उमटल्याविषयी सांगायला गेले. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘त्यांनी एकच्या गतीवर लावलेला पंखा फिरत नव्हता आणि त्याच्यातून ॐ काराचा म् लांबवतो, तशा प्रकारचा ध्वनी येत होता.’ ते ऐकून मला वेगळेच जाणवत होते. तेव्हा ‘जप करतांना बाबा वेगळ्याच अवस्थेत आहेत’, असे मला वाटले; म्हणून मी त्यांना काही बोलले नाही. ‘पंख्यात बिघाड झाला आहे’, असे वाटून मी पंख्याची कळ बंद केली. नंतर थोड्या वेळाने पंख्याची कळ चालू केल्यावर पंखा फिरू लागला.
‘भावपूर्ण नामजप केल्यावर देव आपली हाक ऐकून प्रतिसाद देतो’, याची अनुभूती दिल्याविषयी मी देवाच्या चरणी कृतज्ञ आहे.’
– कु. निधी देशमुख, फोंडा, गोवा. (१७.६.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |