BBC Mocks Mahakumbh : पर्व स्नान ‘देखावा’, तर नागा साधूंचा ‘नग्न’ म्हणून उल्लेख !

‘बीबीसी न्यूज’चा हिंदुद्वेष !

मुंबई – प्रयागराज येथे चालू असलेल्या महाकुंभमेळ्याची ‘बीबीसी न्यूज’ने एका लेखाद्वारे खिल्ली उडवली आहे. पर्वस्नानात पुष्कळ नागा साधूंनी स्नान केले. त्याविषयीचे वृत्तांकन करतांना लेखामध्ये ‘स्नानाचा देखावा’ असा शब्द वापरला आहे.

नागा साधूंना ‘राखेने माखलेले नग्न तपस्वी’ असे संबोधून तसा मथळा या लेखाला देण्यात आला होता; पण सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात टीका झाल्यावर मथळ्यातून ‘नग्न’ हा शब्द ‘बीबीसी’ने काढून टाकला.

संपादकीय भूमिका

बीबीसी कधी अन्य धर्मियांच्या धार्मिक यात्रांवर आक्षेपार्ह विधान करण्याचे धाडस करू शकते का ? हिंदु सहिष्णु असल्यानेच तिचे असे धाडस होत आहे. हिंदूंनी याविरोधात कायदेशीर प्रक्रिया करून बीबीसीवर भारतात बंदी घालण्यासाठी प्रयत्न करणे आता अपरिहार्य ठरले आहे !

(वाचा संपादकीय : ‘बीबीसी’वर लगाम कधी ?)