एकूण १ सहस्र ४०० गुन्हे नोंद, तर ११ कोटी रुपयांचा दंड
संभल (उत्तरप्रदेश) – संभल जिल्ह्यात वीज चोरीची सर्वाधिक प्रकरणे समोर आली आहेत. एका मासात कलम १३५ अंतर्गत १ सहस्र ४०० वीजचोरीचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. यात समाजवादी पक्षाचे स्थानिक खासदार झियाउर रहमान बर्क यांचाही समावेश आहे. याखेरीज काही संस्था, तसेच १६ मशिदी आणि २ मदरसे यांचाही समावेश आहे. आतापर्यंत ‘उत्तरप्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड’ने वीजचोरी प्रकरणात ११ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. यामध्ये २० लाख रुपये वसूल झाले असून उर्वरित रक्कम अद्याप वसूल करायची आहे. १६ डिसेंबर २०२४ या दिवसापासून प्रशासनाने पडताळणी मोहीम राबवली आणि वीज चोरीची प्रकरणे समोर आली. त्याच वेळी खासदार बर्क यांच्या घराचीही पडताळणी करण्यात आली. यातून वीजचोरी होत असल्याचे उघड झाल्यानंतर त्यांना १ कोटी ९१ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
संपादकीय भूमिका
|