नवी देहली – केंद्रीय मंत्रीमंडळाच्या १६ जानेवारीला झालेल्या बैठकीत केंद्रीय कर्मचार्यांना ८ वा वेतन आयोग स्थापन करण्यास संमती देण्यात आली. बैठकीनंतर रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती देतांना सांगितले की, हा आयोग २०२६ पर्यंत स्थापन केला जाईल.
वेतन आयोग प्रत्येक १० वर्षांनी लागू केला जातो. यापूर्वी वर्ष २०१६ मध्ये वेतन आयोग लागू केला होता. ७ व्या वेतन आयोगापूर्वी चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगाचा कार्यकाळ प्रत्येकी १० वर्षांचा होता. सातवा वेतन आयोग वर्ष २०१६ मध्ये लागू झाला होता आणि डिसेंबर २०२५ मध्ये त्याचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे.