बिहारमध्ये १५ दिवसांत सरकारी बंगले रिकामी करण्याच्या सरकारच्या आदेशाला स्थगिती

लोकप्रतिनिधी म्हणून जनतेने निवडून दिलेले लोक नियमबाह्य वर्तन करून जनतेच्या पैशांवर मजा मारतात, हे लोकशाही निरर्थक ठरल्याचे दर्शक होय !

पाटलीपुत्र – बिहारमध्ये माजी मंत्र्यांकडून सरकारी बंगले रिकामी करण्यात न आल्याने सरकारने पुढील १५ दिवसांत ते रिकामी न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याची चेतावणी दिली आहे. त्यांना बळजोरीने बंगल्यातून हाकलण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. दुसरीकडे राष्ट्रीय जनता दलाचे काही मंत्री आणि आमदार यांनी सरकारच्या आदेशाच्या विरोधात पाटणा उच्च न्यायालयात याचिका केल्यानंतर न्यायालयाने या आदेशाला स्थगिती दिली आहे. यावर ६ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.


Multi Language |Offline reading | PDF