श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी नेसलेल्या दोन साड्यांमध्ये झालेल्या पालटांमागील अध्यात्मशास्त्र !

‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी नेसलेल्या साड्यांमध्ये चांगले आणि त्रासदायक पालट झाल्याचे लक्षात आले आहे. ‘हे पालट कशामुळे झाले आहेत आणि त्यामागील आध्यात्मिक कारण काय?’, यांविषयी आपण जाणून घेऊया.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

१. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी अनेक धार्मिक विधींना नेसलेल्या केशरी रंगाच्या साडीवर हाताचा पंजा आणि ओरखडे या आकृत्या उमटण्यामागील अध्यात्मशास्त्र

सुश्री (कु.) मधुरा भोसले

१ अ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ जेव्हा स्थुलातून धार्मिक विधी करतात, तेव्हा त्या विधींचा स्थूल आणि सूक्ष्म अशा दोन्ही स्तरांवर पुष्कळ प्रमाणात आध्यात्मिक लाभ होणे : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ जेव्हा स्थुलातून धार्मिक विधी करतात, तेव्हा त्या विधींचा स्थूल, सूक्ष्म आणि सूक्ष्मतर अशा तिन्ही स्तरांवर पुष्कळ प्रमाणात आध्यात्मिक लाभ होतो. हा लाभ झाल्यामुळे साधकांना होणारे वाईट शक्तींचे त्रास न्यून होऊन त्यांची साधना स्थूल अन् सूक्ष्म अशा दोन्ही स्तरांवर चांगल्या प्रकारे होऊन त्यांची वाटचाल ईश्वरप्राप्तीच्या दिशेने होऊ लागते. तसेच या धार्मिक विधींचा लाभ समष्टी स्तरावर होऊन पृथ्वीवर स्थूल आणि सूक्ष्म अशा दोन्ही स्तरांवर हिंदु राष्ट्र स्थापन होण्याच्या प्रक्रियेतील अडथळे पुष्कळ प्रमाणात दूर होतात.

१ आ. ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी केलेल्या धार्मिक विधींचा आध्यात्मिक स्तरांवरील लाभ साधक आणि समष्टी यांना होऊ नये’ यासाठी पाताळातील मोठ्या वाईट शक्ती श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्यावर सूक्ष्मातून आक्रमणे करणे : ‘साधक आणि समष्टी यांना धार्मिक विधींमुळे होणारे आध्यात्मिक स्तरावरील लाभ होऊ नयेत’, यासाठी पाताळातील मोठ्या वाईट शक्ती श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्यावर सूक्ष्मातून आक्रमणे करतात. तेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी नेसलेली साडी ही चैतन्यामुळे भारित झाल्यामुळे ती श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे चैतन्यदायी चिलखत बनून त्यांचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण करते. जेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी धार्मिक विधींना केशरी रंगाची साडी नेसली होती, तेव्हा सूक्ष्मातून  तिच्यामध्ये श्रीमहालक्ष्मीदेवीची मारक शक्ती काही कालावधीसाठी कार्यरत झाली होती.  त्यामुळे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या सगुण स्तरावरील स्थूल देहावर वाईट शक्तींनी केलेले आक्रमण त्यांनी नेसलेल्या केशरी रंगाच्या साडीने स्वत:वर झेलल्यामुळे तिच्यावर हाताचा पंजा आणि ओरखडे यांच्या आकृती उमटल्या.

२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी गोपूजन आणि अनेक धार्मिक विधींना नेसलेली पांढर्‍या रंगाची साडी पुष्कळ मऊ होण्यामागील अध्यात्मशास्त्र

वायुतत्त्वाचे ‘वेग’ आणि ‘स्पर्श’ हे दोन गुणधर्म आहेत. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी या विधींना नेसलेल्या साडीमध्ये श्रीमहालक्ष्मीदेवीचे तारक तत्त्व वायुतत्त्वाच्या स्तरावर पुष्कळ प्रमाणात कार्यरत झाले होते. वायुतत्त्वाचा गुणधर्म ‘वेग’ असल्यामुळे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी गोपूजन आणि अन्य धार्मिक विधी यांच्या वेळी स्थुलातून केलेले उपचार वायुवेगाने सूक्ष्म स्तरावर कार्यरत होऊन संबंधित देवतेपर्यंत पोचले. वायुतत्त्वाचा गुणधर्म ‘स्पर्श’ असल्यामुळे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी नेसलेल्या साडीमध्ये वायुतत्त्वाच्या लहरी पुष्कळ प्रमाणात कार्यरत झाल्यामुळे या साडीचा स्पर्श पुष्कळ प्रमाणात मऊ जाणवतो.

३. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी नेसलेल्या केशरी आणि पांढर्‍या या दोन्ही रंगाच्या साड्यांची तौलनिक सूत्रे

टीप – केशरी रंगाच्या साडीमध्ये कार्यरत झालेल्या श्रीमहालक्ष्मीदेवीच्या मारक शक्तीमुळे तिचा रंग कधी लालसर दिसत होता, तर तिच्यावर झालेल्या सूक्ष्मातील आक्रमणामुळे तिच्या साठलेल्या काळ्या शक्तीचा करडा रंग दिसत होता. पांढर्‍या रंगाच्या साडीमध्ये पूर्णपणे श्रीमहालक्ष्मीदेवीचे तारक तत्त्व कार्यरत असल्यामुळे तिचा रंग सूक्ष्मातून गुलाबी दिसत होता.

तात्पर्य 

वरील सूत्रांवरून हे लक्षात येते की, धार्मिक विधी करणे, म्हणजे एकप्रकारे दैवी शक्तींशी वाईट शक्तींशी केलेले सूक्ष्म युद्धच असते. ‘या युद्धात वाईट शक्तींनी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्यावर सूक्ष्मातून कितीही आक्रमणे केली, तरी त्यांच्या मागे दैवी शक्तींचे पाठबळ असल्यामुळे त्यांचे रक्षण होते’, हे सूत्र शिकायला मिळाले. त्यामुळे साधकांना धार्मिक विधींच्या वेळी विविध प्रकारच्या दैवी साक्षी मिळून दिव्य अनुभूती येतात आणि सूक्ष्मातील आक्रमणांचे पडसाद स्थुलातूनही पहायला मिळतात.

कृतज्ञता

‘या धारिकेच्या माध्यमातून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी नेसलेल्या साड्यांमध्ये झालेल्या चांगल्या आणि त्रासदायक पालटांच्या संदर्भातील आध्यात्मिक कार्यकारणभाव उमजला’, यासाठी मी सच्चिदानंद परब्रह्म (डॉ.) आठवले यांच्या प्रती अनन्यभावाने कृतज्ञता व्यक्त करते.’

– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.३.२०२३)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.