‘संत विशिष्ट कारणांसाठी प्रतिदिन विशिष्ट कालावधीसाठी नामजप करायला सांगतात. ‘संतांचे आज्ञापालन म्हणून त्यांनी जितका वेळ नामजप करायला सांगितला आहे, तितकाच वेळ करावा. स्वतःच्या मनाने त्याचा कालावधी न्यून किंवा अधिक करू नये; कारण त्या कालावधीसाठी संतांचा संकल्प झालेला असतो’; पण संतांनी सांगितलेला नामजप करतांना ‘या कालावधीत मनात इतर विचार आले’, किंवा ‘नामजप भावपूर्ण झाला नाही’, या विचारांनी ती वेळ भरून काढण्यासाठी काही वेळा साधक अधिक वेळ नामजप करतात. ‘असे करणे योग्य आहे कि अयोग्य ?’, ‘यामध्ये लाभ किंवा हानी कशा प्रकारे होते ?’, याचे योगमार्गानुसार होणार्या परिणामांचे सविस्तर विवेचन येथे दिले आहे.
१. ‘संतांनी सांगितलेल्या नामजपाच्या कालावधीत जेव्हा साधक स्वतःच्या मनाने वाढ करतात, तेव्हा साधकांच्या योगमार्गांनुसार साधकांना आध्यात्मिक स्तरावर लाभ किंवा हानी किती आणि कशामुळे होते ?’, ते पुढे सारणीत दिले आहे.

टीप : कर्मयोगानुसार प्रत्येक कर्माच्या मागील उद्देश महत्त्वाचा असतो. येथे साधक संतांवर अविश्वास ठेवून नामजपाचा कालावधी वाढवत नाहीत; तर संतांनी सांगितलेला नामजप करतांना ‘या कालावधीत मनात इतर विचार आले, नामजप भावपूर्ण झाला नाही’, या विचारांनी ती वेळ भरून काढण्यासाठी साधक अधिक काळ नामजप करतात. त्यामुळे हानी होण्यापेक्षा त्यांना आध्यात्मिक स्तरावर लाभ होण्याचे प्रमाण अधिक आहे.
२. सारांश
संतांनी सांगितलेला नामजप विशिष्ट प्रमाणात घेतलेल्या औषधासारखे कार्य करतो. ज्याप्रमाणे विशिष्ट प्रकारच्या औषधाचे प्रमाण वाढवले, तर व्यक्तीला त्रास होऊ शकतो, त्याप्रमाणे संतांनी विशिष्ट कालावधीसाठी सांगितलेल्या नामजपामुळे परिणाम होऊ शकतो. संतांनी सांगितलेल्या कालावधीपेक्षा साधकांनी अधिक वेळ जप केल्यामुळे विविध योगमार्गांनुसार होणारी हानी आणि लाभ यांचे प्रमाण अन् स्वरूप यांचा अभ्यास केल्यावर साधकाने स्वतःच्या मनाने नामजपाचा कालावधी न वाढवता, ‘संतांनी सांगितलेल्या कालावधीपुरताच नामजप केला, तर त्याला आध्यात्मिक दृष्टीने व्यष्टी आणि समष्टी अशा दोन्ही स्तरांवर अधिक लाभ होऊ शकतो’, असे दिसून येते; म्हणून साधकांनी संतांनी सांगितलेला नामजप सांगितलेल्या कालावधीसाठीच करावा आणि दिवसभरात काळानुसार आवश्यक असणारा ‘निर्विचार’ किंवा ‘श्रीकृष्ण’ हा नामजप अधिकाधिक करावा.’
– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.६.२०२४)
|