
एका डॉक्टरने प्रश्न विचारला, ‘दर्शनाला आलेल्या प्रत्येक व्यक्तीची वृत्ती संतांना कळते. ती कशी कळते ?’ श्रीमहाराजांनी (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी) उत्तर दिले, ‘हे व्हायला स्वतःचे मन शुद्ध आणि सूक्ष्म व्हावे लागते. ताप मोजण्याची नळी (थर्मामीटर) लावून रोग्याला ताप किती आहे, हे तुम्हाला कळते, तसाच हा प्रकार आहे. नळीला स्वतःला ताप कधीच येत नाही. त्याचप्रमाणे संत स्वतः वृत्तीच्या पलीकडे गेलेले असतात; म्हणून ते दुसर्याची वृत्ती अचूक ओळखतात.’
(साभार : ‘श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृद्य आठवणी’ या पुस्तकातून, लेखक : ल.ग. मराठे)