देशात गेल्या काही वर्षांत ‘सर तन से जुदा’च्या (शिरच्छेदाच्या) घोषणा सर्वत्र ऐकायला मिळत आहेत. केवळ ऐकायलाच नव्हे, तर प्रत्यक्षातही तशी कृत्ये केली जात आहेत. राजस्थानमध्ये कन्हैयालाल नावाच्या शिंप्याचा धर्मांध मुसलमानांनी उघडपणे आणि दिवसाढवळ्या गळा चिरला. इतकेच नाही, तर त्याचे चित्रीकरण करून त्याचा व्हिडिओ प्रसारित केला. यातून हिंदूंमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होता. ही मानसिकता आजची नाही, तर गेल्या १ सहस्र वर्षांपासून ती पहात आहोत. आता केवळ ‘सर तन से जुदा’ची घोषणा नव्याने होऊ लागली आहे. कन्हैयालाल यांची हत्या करणार्यांना काही घंट्यांतच अटक करण्यात आली; मात्र आता २ वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतरही त्यांना शिक्षा झालेली नाही. अशा प्रकारची दिरंगाई इतक्या संवेदनशील प्रकरणात होत असेल, तर समाजामध्ये कायद्याचा धाक कसा बसेल ? त्यातही जिहादी मानसिकतेच्या लोकांच्या मनात धाक बसणे अवघडच आहे; कारण ते त्यांच्या कथित धर्मासाठी आत्मघात करण्यास सिद्ध असतात. त्यामुळे त्यांना फाशीचीही भीती वाटत नाही. अशा वेळी जर शिक्षा होण्याला दिरंगाई होत असेल, तर ती लज्जास्पदच म्हणायला हवी. त्यामुळेच ‘भारतात कुणाचीही हत्या करा आणि न्यायालयीन प्रक्रियेतून स्वतःचा बचाव करा’, अशीच काहीशी मानसिकता निर्माण झाल्याचे दिसते. त्यामुळेच ‘सर तन से जुदा’च्या घोषणा थांबलेल्या नाहीत. जर अशांना काही मासांतच फाशीची शिक्षा झाली असती, तर जनतेला ‘देशात कायद्याचे गतीमान राज्य आहे’, असे वाटले असते.
धर्मांधांना पाठीशी घालणार्यांना कारागृहात डांबा !
नुकतेच उत्तरप्रदेशातील सुलतानपूर येथे क्षुल्लक वादातून धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर आक्रमण केले आणि ‘आमचे सरकार (इंडी आघाडी किंवा समाजवादी पक्ष) आल्यावर तुमचे गळू कापू आणि त्यांचे केस मशिदीत ठेवू’, अशा प्रकारची धमकी दिली. यातून अशा धर्मांधांना कोण बळ पुरवत आहे ?, कोण पाठीशी घालत आहे ? किंवा ते कुणामुळे शेफारतात ?, हे लक्षात येते. भारत धर्मनिरपेक्ष देश असतांना मतांच्या लांगूलचालनासाठी राजकीय पक्ष मुसलमानांना खुश करण्यासाठी वाट्टेल ते करतात, हे गेल्या ७८ वर्षांत हिंदू पहात आहेत. त्याचा परिणाम भारताची प्रगती, सुरक्षा, हिंदूंची धार्मिक स्थळे यांच्यावर होत आला आहे, हेही अनुभवले आहे; मात्र गेल्या १० वर्षांत ही स्थिती पालटत असली, तरी धर्मांधांची मूळ मानसिकता कायम असल्याने तिला चिरडण्यासाठी अत्यंत कठोर होण्याची आवश्यकता आहे. धर्मांधांना विश्वास आहे की, या राजकीय पक्षांचे सरकार आल्यावर ते काहीही करू शकतात, तो नष्ट करण्यासाठी आता असलेल्या राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य करणार्या सरकारने अशा धर्मांधांची मानसिकता मुळासकट चिरडण्यासाठी कठोर झाले पाहिजे. पुन्हा त्यांच्या मनात ‘कुठलेही सरकार आले, तरी गुन्हेगारी कृत्य करण्याचा १०० वेळा विचार केला जाईल’, अशी स्थिती निर्माण केली पाहिजे. तसे केले, तरच त्यांच्यावर वचक बसेल. जनतेने अशा राजकीय पक्षांना सत्ताच्युत करून घरी बसवले असले, तरी आताच्या सरकारने त्यांना कारागृहात कसे बसवता येईल, हेही पाहिले पाहिजे. आपले ‘मायबाप’ असणार्या राजकीय पक्षांची स्थिती पाहिल्यावर या धर्मांधांच्या मनात धडकी भरली पाहिजे, तशी स्थिती निर्माण करायला हवी. साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित आदींना खोट्या घटनांच्या प्रकरणात अनेक वर्षे कारागृहात डांबून त्यांचा छळ करणार्या राजकीय पक्षांच्या प्रमुखांना त्यांच्या अनेक बेकायदेशीर कृत्यांसाठी कारागृहात टाकले पाहिजे, तरच ‘गळे कापू’, असे म्हणणार्यांवर काही प्रमाणात तरी वचक बसेल.