Pakistani Citizens Evicted : भीक मागणे, चोरी, दरोडा आदींच्या प्रकरणी ७ देशांनी पाकिस्तानी नागरिकांना हाकलले !

(ग्रूमिंग जिहाद सध्या ब्रिटनमध्ये चालू असून याद्वारे तेथील पाकिस्तानी वंशील लोकांकडून अल्पवयीन मुलींना फसवून त्यांचे लैंगिक शोषण केले जाते)

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानी नागरिक त्यांच्या देशातील गरिबी आणि बिघडत्या परिस्थितीमुळे इतके त्रस्त आहेत की, ते इतर देशांमध्ये जाऊन रहाण्यासाठी प्रत्येक मर्यादा ओलांडत आहेत. कधी ते हज किंवा उमराह (मक्केची छोटी यात्रा) यांच्या नावाखाली सौदी अरेबियात जाऊन भीक मागतात, तर कधी ते इतर देशांमध्ये जाऊन चोरी आणि दरोडा यांसारखे गुन्हे करतात. यांमुळे ७ हून अधिक देश अशा पाकिस्तानी नागरिकांवर कठोर कारवाई करत आहेत. पाकिस्तानी वृत्तवाहिनी ‘सामा न्यूज’नुसार सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात आणि चीनसह ७ देशांमधून २५८ पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या मायदेशी परत पाठवण्यात आले आहे. या नागरिकांपैकी १६ जणांना कराची पोचताच विविध कायदेशीर प्रक्रियांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली.

१. २३२ जणांना सौदी अरेबियातून आणि २१ जणांना संयुक्त अरब अमिरातीतून हद्दपार करण्यात आले, ज्यांत ७ भिकारी होते. सौदी अरेबियातून हद्दपार केलेले १६ लोक त्यांच्या व्हिसाची (एखाद्या देशात प्रवेश करण्याची, एखादा देश सोडून जाण्याची किंवा एखाद्या देशातून प्रवास करण्याची अनुमती देणारा अधिकृत कागद किंवा शिक्का.) मुदत संपल्यानंतरही येथे रहात होते.

२. पाकिस्तान ज्याला आपला सर्वांत जवळचा मित्र मानतो, त्या चीननेही पाकिस्तानी लोकांना देशाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. चीन, कतार, इंडोनेशिया, सायप्रस आणि नायजेरिया येथून प्रत्येकी एका पाकिस्तान्याला हद्दपार करण्यात आले आहे.


हे ही वाचा → Pakistani Grooming Gang In UK : ब्रिटनमधील ‘पाकिस्तानी ग्रूमिंग गँग’च्या प्रकरणी पंतप्रधान स्टार्मर यांना कारागृहात पाठवा !


अमली तस्करीत पाकिस्तानींचा सहभाग

सौदी अरेबिया येथे २७ पाकिस्तानी लोक विनाअनुमती काम करत होते. त्यांपैकी काही जण अमली पदार्थांच्या तस्करीतही सहभागी होते.

संपादकीय भूमिका

जागतिक स्तरावर पाकिस्तानी नागरिकांची लायकी हीच आहे. आतंकवाद, ‘ग्रूमिंग जिहाद’ आदी कृत्य करणार्‍यांचा भरणा असणार्‍या या देशावर जगाने आता सर्व प्रकारचा बहिष्कार घालून धडा शिकवणे अपरिहार्य झाले आहे !