प्रयागराज, १२ जानेवारी (वार्ता.) – कुंभमेळ्यामध्ये वाहने लावण्यासाठी अडचण येऊ नये, यासाठी एकूण १०१ भव्य ‘स्मार्ट पार्किंग’ व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये नियमित ५ लाख वाहने लावता येणार आहेत. अरैल, प्रयागराज शहर, झूंसी, फाफामऊ येथील सर्व मिळून १ सहस्र ८६७.४ हेक्टर भूमीवर ही वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. कुंभमेळ्यासाठी अनेक भाविक बसगाड्या, चारचाकी गाड्या घेऊन आले आहेत. वाहने लावण्यास त्यांना असुविधा होऊ नये, यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.