Mahakumbh 2025 Kalpwas : कल्पवासींच्या व्रतासाठी कुंभक्षेत्र सज्ज : सरकारकडून विशेष सोयीसुविधा !

माघ पौर्णिमा अर्थात् १३ जानेवारीपासून कल्पवासाला आरंभ !

कुंभक्षेत्री प्रवेश करतांना कल्पवासी

कल्पवास म्हणजे काय ?

कल्पवासी म्हणजे माघ पौर्णिमा ते पौष पौर्णिमा या १ मासाच्या कालावधीत कुंभमेळा क्षेत्रात वास करून तीर्थास्नान, नामजप आदी करणारे साधक. काही कल्पवासी काही दिवस, तर काही जण १२ वर्षांपर्यंतही कल्पवास करतात.

प्रयागराज, ११ जानेवारी (वार्ता.) – येथील गंगा, यमुना आणि सरस्वती या ३ नद्यांच्या पवित्र संगमतीरी कल्पवास व्रत करणार्‍या कल्पवासींसाठी कुंभक्षेत्र सज्ज झाले आहे. देशभरातून कल्पवासींचे कुंभक्षेत्री आगमन झाले आहे. यंदा महाकुंभपर्वात २० ते २५ लाख कल्पवासी येतील, असा अंदाज प्रशासनाने वर्तवला आहे.

कुंभक्षेत्री प्रवेश करतांना कल्पवासी

माघ पौर्णिमा अर्थात् १२ जानेवारी ते पौष पौर्णिमा, म्हणजेच १३ फेब्रुवारी या एक महिन्याच्या कालावधीत हे व्रत केले जाते. अनेक कुटुंबेच्या कुटुंबेही कल्पवास करतात. येणार्‍या सर्व कल्पवासींनी एका महिन्यासाठी लागणारे जीवनावश्यक वस्तू समवेत आणल्या आहेत. कल्पवासींना प्रशासनाने अन्न-धान्य, निवास, चिकित्सालय आदी सोयीसुविधा दिल्या आहेत.