प्रयागराज – महाकुंभमेळ्याच्या प्रीत्यर्थ प्रयागराज-रायबरेली महामार्गावरील अंधियारी टोलनाक्यावर कुणाकडून टोल वसूल न करण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला आहे. १० जानेवारी ते २८ फेब्रुवारीपर्यंत कुणाकडूनही टोलवसुली केली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. टोलवसुली बंद करणार असल्याची कुठलीही पूर्वसूचना लोकांना नव्हती. १० जानेवारीला मध्यरात्री १२ वाजता अचानकपणे टोलवसुली थांबवण्यात आली. काही वेळानंतर लोकांना कारण समजले. या निर्णयाचे भाविकांनी स्वागत केले आहे.