सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाचे क्षणमोती आठवत असतांना साधिकेने अनुभवलेला भावजागृतीचा प्रयोग !

‘एकदा मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाचे क्षण आठवत होते. त्या वेळी मी अनुभवलेला भावजागृतीचा प्रयोग येथे दिला आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रीतीमय नेत्रांतून प्रकाशाचा एक अत्यंत तेजस्वी गोळा बाहेर पडून तो गोळा साधिकेच्या हृदयात जाणे आणि त्यातून अनेक गोळे निर्माण होऊन ते तिच्या सर्व अवयवांत जाणे

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांकडे कृपाळू दृष्टीने पाहिले. तेव्हा त्यांच्या प्रीतीमय नेत्रांतून प्रकाशाचा एक अत्यंत तेजस्वी गोळा बाहेर पडला. मी जिज्ञासेने ‘तो गोळा कुठे जात आहे ?’, याचा विचार करत आहे. मी डोळे बंद केल्यावरही मला तो गोळा दिसत आहे. तो गोळा माझ्या हृदयात गेला आणि तेथे त्यातून अनेक लहान तेजस्वी गोळे बाहेर पडले अन् ते शरिराच्या सर्व अवयवांत पसरले.

कु. कौमुदी जेवळीकर

२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रीतीमय नेत्रांतून बाहेर पडलेल्या मोठ्या गोळ्यातून अनेक लहान गोळे बाहेर पडून ते मन, बुद्धी आणि चित्त यांमध्ये जाणे

मोठा गोळा माझ्या शरिरात आहे तसाच आहे. तो मोठा गोळा अधिक तेजस्वी होऊन माझ्या आत जात असल्याचे मला जाणवत आहे. तो माझ्या मनाच्या आत गेला. तेथे त्यातून अत्यंत तेजस्वी लहान गोळे निर्माण झाले आणि ते माझ्या मनाच्या कानाकोपर्‍यात गेले. तो मोठा गोळा आता आणखी माझ्या आत जात आहे. आता तो गोळा अधिकच तेजस्वी झाला आहे. त्याने माझ्या बुद्धीत प्रवेश केला आहे. तेथेही त्यातून अत्यंत तेजस्वी लहान गोळे सिद्ध झाले आणि ते गोळे माझ्या बुद्धीच्या कानाकोपर्‍यात गेले आहेत. अजूनही तो मोठा गोळा माझ्या आत जातच आहे. या वेळी त्या गोळ्याचे तेज लख्ख प्रकाशासारखे आहे. तो गोळा आता माझ्या चित्तात जात आहे. तो गोळा चित्तात गेल्याक्षणी त्या सुंदर गोळ्यात मला प.पू. डॉक्टरांचे दर्शन झाले.

३. जो गोळा शरीर, मन, बुद्धी आणि चित्त यांत गेला, तो केवळ प्रकाश नव्हे, तर मला या सर्वांमध्ये प.पू. डॉक्टरांचे अस्तित्व जाणवत आहे. प.पू. डॉक्टरांनीच आपले सर्वकाही व्यापले आहे.’

– कु. कौमुदी जेवळीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.१२.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक