राज्यातील ४ सहस्र ५०० आधुनिक वैद्यांवर कारवाई होण्याची शक्यता !

ही घटना म्हणजे वैद्यकीय क्षेत्राला कलंक नव्हे का ?

मुंबई – सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांतून शिक्षण पूर्ण केल्यानंतर बंधपत्र (बॉन्ड) पूर्ण न करणार्‍या आधुनिक वैद्यांच्या (डॉक्टरांच्या) नोंदणीच्या नूतनीकरणाला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे नोंदणीचे नूतनीकरण न करताच वैद्यकीय सेवा बजावणार्‍या राज्यातील ४ सहस्र ५०० आधुनिक वैद्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. २००१ ते २०११ या १० वर्षांमध्ये बंधपत्र पूर्ण न करणार्‍या आधुनिक वैद्यांच्या नोंदणीच्या नूतनीकरणाला जानेवारी २०१७ मध्ये स्थगिती देण्यात आली. राज्यातील अशा आधुनिक वैद्यांना त्यांनी शिक्षण घेतलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाद्वारे नोटीस पाठवण्यात आली आहे.


Multi Language |Offline reading | PDF