‘एके दिवशी माझ्या मनात ईश्वराविषयी पुष्कळ भाव दाटून येऊन ‘देवाने मानवाला भावाच्या जाणिवेची पुष्कळ मोठी भेट दिली आहे’, असे मला जाणवले. त्या वेळी मला ‘भाव आणि भक्ती’ यांचा भावार्थ सुचवला.
१. ‘भाव आणि भक्ती ’ यांचा देवाने सुचवलेला भावार्थ !
१ अ. भाव : सकारात्मकता आणि ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव असणे, म्हणजे भाव.
१ आ. भक्ती : ईश्वराच्या अस्तित्वाची सतत जाणीव असणे आणि ईश्वराच्या अस्तित्वाशी एकरूप होणे, म्हणजे भक्ती.
२. भावाचे रूपांतर भक्तीमध्ये होण्यासाठी प्रत्येक कृती सकारात्मक आणि ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव ठेवून करणे आवश्यक असणे
व्यक्तीतील देव किंवा गुरु यांच्या प्रतीच्या भावामुळे व्यक्ती सकारात्मक असते आणि ती देव अन् गुरु यांच्या अनुसंधानात रहाते. भावाचे रूपांतर भक्तीमध्ये होण्यासाठी प्रत्येक कृती भावाच्या स्तरावर, म्हणजेच सकारात्मक राहून आणि ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव मनात ठेवून करणे आवश्यक आहे; म्हणूनच ‘भाव तिथे देव !’, असे म्हटले आहे. भक्तीच्या टप्प्याला जाण्यासाठी व्यक्तीमध्ये भाव असणे अत्यावश्यक आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला वरील सूत्रे अनुभवायला दिली, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. रजनीगंधा कुर्हे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.