(म्हणे) ‘चीनने भारताची शक्ती ओळखल्याने त्याच्याशी आता कोणताही वाद नाही !’ – राजनाथ सिंह

असे आहे, तर चीनने १९६२ मध्ये बळकावलेला भारताचा भाग भारत त्याच्याकडून का हिरावून घेत नाही ?

चीनने ‘डोकलाम आमचा भाग आहे’, असे सांगितले आहे, हे राजनाथ सिंह का लपवत आहेत ?

परत परत दिशाभूल करणारी विधाने करून जनतेला अंधारात ठेवणारे गृहमंत्री असणारा जगातील एकमेव देश भारत !

लक्ष्मणपुरी – भारत आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, तर तो अत्यंत शक्तीशाली झाला आहे. चीनने भारताच्या शक्तीला ओळखल्याने त्याच्याशी असणारा वाद सुटला आहे, असे विधान केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे पत्रकार परिषदेत केले.  राजनाथ सिंह पुढे म्हणाले की, पाक त्याचे आतंकवादी भारतात पाठवतो; मात्र आम्ही प्रतिदिन ५ ते १० आतंकवाद्यांना ठार करत आहोत. (पाक भारतात आतंकवादी पाठवतो, तर थेट त्यालाच का धडा शिकवत नाहीत ? आतंकवाद्यांच्या आक्रमणात आतंकवाद्यांसमवेत लढतांना भारताचे सैनिकही हुतात्मा होतात, हे राजनाथ सिंह का सांगत नाहीत ?  पाक आणखी किती वर्षे असेच आतंकवादी पाठवत रहाणार आणि आपण त्यांना ठार करत रहाणार ? ही समस्या कायमची का सोडवत नाही ? – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now