सांगली जिल्ह्यातील जत येथे ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’च्या वतीने‘शिवप्रतापदिना’च्या निमित्ताने ‘अफझलखानवधा’चा डिजिटल फलक लावला होता; मात्र जत पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकार्यांनी पथकासह येऊन हा फलक जप्त केला. अफझलखानवधाच्या प्रसंगाला भारताच्या इतिहासात वेगळे स्थान आहे. या घटनेनंतर मराठ्यांची मोगलांसह अन्य इस्लामी आक्रमकांवर जरब बसली आणि मराठा साम्राज्याचा दबदबा निर्माण झाला. स्वराज्यावर चाल करून येणार्या अत्याचारी लोकांचा समाचार कसा घ्यायला हवा ?, याचा वस्तूपाठ छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझलखानवधातून दाखवून दिला.
आज भारताच्या आजूबाजूला असलेल्या शत्रूदेशांची वक्रदृष्टी भारतावर आहे. त्यामुळे छत्रपतींचा हा इतिहास पुन्हा गिरवण्याची आवश्यकता आहे. असे असतांना शिवप्रतापदिनाच्या निमित्ताने हा फलक लावल्यावर पोलिसांचे पित्त का खवळले ? ‘असे फलक लावल्यामुळे विशिष्ट समाजाच्या धर्मभावना दुखावल्या जातात. ते बिथरतात आणि त्यामुळे त्यांच्याकडून हिंसाचार केला जातो. परिणामी कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा येते’, असे पोलिसांकडून नेहमीच सांगितले जाते. असे आहे, तर पोलीस कशासाठी आहेत ? भारतात राहून देशाचा खरा इतिहास कुणी नाकारत असेल किंवा तो दाखवण्यावर आक्षेप घेत असेल, तर त्याला विरोध करायला हवा कि त्याच्या म्हणण्याला खतपाणी घालायला हवे ? या फलकांवर कुणी आक्षेप घेत असेल, तर पोलिसांनी या फलकांना संरक्षण द्यायला हवे; मात्र अफझलखानवधाच्या चित्राविषयी पोलीस नेहमीच बोटचेपी भूमिका घेतांना दिसतात. असे केल्याने कायदा आणि सुव्यवस्था राखली जाते, असे पोलिसांना वाटत असेल, तर तो त्यांचा भ्रम आहे; कारण भारतात मुसलमानांचा उद्दामपणा दिवसेंदिवस वाढत आहे. बर्याच ठिकाणी दंगलींवर नियंत्रण मिळवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर धर्मांधांनी गोळीबार, तसेच दगडफेक केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. भारतात बर्याच ठिकाणी धर्मांधांनी पोलीस ठाणी जाळल्याचे प्रकारही समोर आले आहेत. त्यामुळे अशा धर्मांधांचा धोका जेवढा सामान्य जनतेला आहे, तेवढाच किंबहुना त्याहून अधिक तो पोलिसांनाही आहे. त्यामुळे अशांना चुचकारणे, हा आत्मघात आहे. जत प्रकरणामध्ये हिंदूंनी केलेल्या शांततापूर्ण आंदोलनानंतर पोलीस प्रशासनाला जाग आली. पोलीस प्रशासनाने अफझलखान वधाचा फलक लावण्याची अनुमती दिल्यानंतर हिंदुत्वनिष्ठांनी हा फलक पुन्हा लावला; मात्र ‘साध्या गोष्टींसाठी हिंदूंवर आंदोलन करण्याची वेळ का येते ? हा फलक काढणार्या पोलीस अधिकार्यांवर काय कारवाई होणार ?’, हेही पोलीस प्रशासनाने सांगायला हवे. अन्यथा ‘असे पोलीस भारताचे कि पाकचे ?’, असा प्रश्न राष्ट्र आणि धर्म प्रेमी नागरिक पोलिसांना विचारत रहाणार !