रामनाथी आश्रमातील कु. सिद्धी गावस हिने आध्यात्मिक त्रासातून बाहेर पडण्यासाठी केलेलेे प्रयत्न, याविषयीचा लेख आपण ९ डिसेंबर या दिवशी पाहिला. आज या लेखाचा अंतिम भाग पाहूया.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/861739.html
५. स्वतःमध्ये झालेले पालट
५ ऊ. व्यष्टी साधना मनापासून करणे : आता मला व्यष्टी साधना मनापासून करावीशी वाटते. मी एखाद्या रुग्णाईत साधिकेच्या समवेत रुग्णालयात गेले, तरी तेथे रुग्णालयात रांगेत उभी राहून नामजप लिहिते आणि सारणीलिखाण (टीप) करते.
(टीप : स्वतःकडून झालेल्या चुका वहीत लिहून त्यावर योग्य दृष्टीकोन लिहिणे)
५ ए. सेवा मनापासून करणे : आता माझा सेवेतील सहभाग वाढला आहे. पूर्वी मी सेवेला कधीतरी जायचे. मला सेवा करण्यासाठी बोलवावे लागायचे.
५ ऐ. रुग्णाईत साधिकांची सेवा मनापासून करणे
१. एखाद्या रुग्णाईत साधिकेला रुग्णालयात भरती केल्यानंतर मी त्या साधिकेची मनापासून सेवा करते.
२. आरंभी मला रुग्णाईत साधिकेविषयी पुष्कळ प्रतिक्रिया यायच्या. माझ्यातील ‘अपेक्षा करणे’ या अहंच्या पैलूवर प्रयत्न केल्यानंतर मला परिस्थिती स्वीकारता येऊ लागली आणि रुग्णाईत साधिकेविषयी सकारात्मक विचार करणे जमू लागले.
३. सरकारी रुग्णालयात एखाद्या साधिकेसमवेत रहातांना मला परिस्थिती आनंदाने स्वीकारता येतेे. माझे घर रुग्णालयापासून जवळ असले, तरी ‘घरच्यांनी मला काही साहाय्य करावे’, असे मला वाटत नाही.
५ ओ. आत्मविश्वास वाढणे
१. मी पूर्वी दुचाकी चालवण्याचा सराव करत होते. तेव्हा मला पुष्कळ भीती वाटायची. मी सलग १० दिवस पटांगणात केवळ दुचाकी चालवत होते. आता मी ४ दिवसांतच दुचाकी चालवायला शिकले.
२. इतरांशी बोलतांना माझ्यात आत्मविश्वास नसायचा. त्यामुळे मला इतरांशी बोलतांना दडपण असायचे. आता मला इतरांशी सहजतेने आणि ताणविरहित बोलता येते.
५ औ. आनंद वाटणे : पूर्वी मी कुठे बाहेर निघाले की, ‘माझ्यावर काहीतरी संकट कोसळणार आहे’, अशी मला भीती वाटायची. आता मी पुष्कळ आनंदी झाले आहे. ‘विश्वभरातील सर्व आनंद माझ्याच पदरात पडलेला आहे’, असे मला वाटते.
५ अं. नामजपाची गोडी लागणे
१. मी पहाटे उठल्यावरही ‘दमायला झाले आणि आता विश्रांती घ्यावी’, असे मला वाटत नाही. आता नामजप करतांना मला झोप येत असेल, तर मी ३ घंटे उभी राहून नामजप करते.
२. पूर्वी मी दिवसभर नामजपच करत रहायचे. नंतर मला ६ घंटे नामजप करण्यास सांगितला. नामजप करतांना मला झोप आली, तर मी उभी राहून नामजप करायचे. आता माझ्या त्रासाची तीव्रता उणावली आहे. आता मला नामजप करतांना झोप येत नाही.
आधुनिक वैद्या (डॉ.) (सौ.) नंदिनी सामंत यांनी मला पालटण्याची दिशा दिल्यावर मला ते कृतज्ञतेने स्वीकारता आले. सहसाधिकेनेही चुका सांगून माझ्यात सुधारणा होण्यास साहाय्य केले. त्याबद्दल या सर्वांविषयी मला कृतज्ञता वाटते.’
(समाप्त)
– कु. सिद्धी गावस, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.४.२०२४)
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. |