रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमातील शांत आणि संयमी स्‍वभावाचे चि. सूरज पाटील अन् संतांविषयी भाव आणि सेवेची तळमळ असलेल्‍या चि.सौ.कां. वैदेही खडसे !

आज, ११.१२.२०२४ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात चि. सूरज पाटील आणि चि.सौ.कां. वैदेही खडसे यांचा विवाह आहे. त्‍यानिमित्त चि. सूरज पाटील यांचे आई-वडील आणि आश्रमातील साधक यांना, तसेच चि.सौ.कां. वैदेही खडसे यांची आश्रमातील साधिकांना जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.

चि. सूरज पाटील आणि चि.सौ.कां. वैदेही खडसेे यांना शुभविवाहानिमित्त सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्‍छा !

वाहन चालवण्‍याची सेवा तळमळीने करणारे चि. सूरज पाटील !

१. सौ. पूजा पाटील (श्री. सूरज पाटील यांची आई, आध्‍यात्मिक पातळी ६४ टक्‍के, वय ५२ वर्षे), बेळगाव.

अ. ‘श्री. सूरज याने लहानपणापासून आतापर्यंत कोणत्‍याच बाबतीत कसलाही हट्ट केला नाही.

आ. त्‍याच्‍यात समजूतदारपणा हा गुण लहानपणापासून आहे. त्‍याने आवश्‍यकतेनुसार काही वस्‍तू घेतल्‍या.’

२. श्री. परशुराम पाटील (श्री. सूरज पाटील यांचे वडील, आध्‍यात्मिक पातळी ६३ टक्‍के, वय ५५ वर्षे), बेळगाव.

२ अ. सेवेची ओढ 

१. ‘लहानपासूनच सूरजच्‍या आईने त्‍याला नामजपाची गोडी लावली. शाळेला सुट्टी असतांना ती त्‍याला आश्रमात सेवेला पाठवत असे. त्‍यामुळे त्‍याला सेवा आणि आश्रम यांविषयी ओढ निर्माण झाली.

२. सूरज कामावरून आल्‍यावर विश्रांती न घेता लगेच आश्रमात सेवेला येतो. ‘मला थोडा वेळ मिळतो, तर सेवा आणि व्‍यष्‍टी साधना यांसाठी वेळ द्यावा’, असा त्‍याचा विचार असतो.

२ आ. वाहन चालवण्‍याची सेवा आवडीने करणे

१. लहानपणापासून त्‍याला दुचाकी आणि चारचाकी वाहन चालवण्‍याची आवड होती. तो आश्रमात आल्‍यावर वाहन चालवणे शिकला आणि त्‍यासंदर्भातील सेवा करू लागला.

२. सूरज वाहनांची स्‍वच्‍छता नियमित आणि आवडीने करतो.

३. वाहन सेवेच्‍या माध्‍यमातून त्‍याने साधकांचा विश्‍वास संपादन केला आहे.

२ इ. सेवेच्‍या माध्‍यमातून त्‍याने प.पू. दास महाराज यांचेही मन जिंकले आहे. 

‘हे प.पू. गुरुमाऊली, तुम्‍हीच असा गुणी मुलगा देऊन आम्‍हा सर्व कुटुंबियांकडून साधना करवून घेत आहात. त्‍यासाठी आपल्‍या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’

३. कु. प्रांजली शिरोडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. 

अ. ‘दादा सर्व साधकांशी नम्रतेने बोलतो.

आ. दादा नोकरी करून प्रतिदिन साधकांना वाहनाने ने-आण करायची सेवा आनंदाने करतो.’

४. श्री. रवींद्र बनसोड, फोंडा, गोवा.

अ. सूरजमध्‍ये सेवाभाव चांगला असून अहं अल्‍प असल्‍याचे जाणवते.

आ. सूरज याचा स्‍वभाव शांत आणि संयमी स्‍वरूपाचा आहे. त्‍याला कधीही कोणाशी उलट बोलतांना बघितले नाही, तसेच सूरजची वृत्ती समाधानी असल्‍याचे जाणवते.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : २५.११.२०२४)                               ०

आश्रमातील साधिकांना साधनेत साहाय्‍य करून त्‍यांची आध्‍यात्मिक मैत्रीण बनलेल्‍या चि.सौ.कां. वैदेही खडसे !

११.१२.२०२४ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात चि. सूरज पाटील आणि चि.सौ.कां. वैदेही खडसे यांचा विवाह आहे. त्‍यानिमित्त कु. वैदेही खडसे यांची आश्रमातील साधिकांना जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत. 

१. कु. प्रांजली शिरोडकर

१ अ. सेवेची तळमळ : ‘वैदेही स्‍वयंपाकघरात सेवा करते. ती दमली असली, तरीही तिच्‍या चेहर्‍यावर तसे दिसत नाही.

१ आ. इतरांना साहाय्‍य करणे 

१. ती पोळ्‍या लाटत असेल किंवा भाकरी तव्‍यावर भाजत असेल, तर ती मला सांगते, ‘‘तू करून बघ. तुलाही ही सेवा जमायला हवी.’’

२. एकदा माझ्‍या मनाची स्‍थिती नकारात्‍मक झाली होती. त्‍या वेळी मी वैदेहीला माझ्‍या मनातील विचार सांगितले. त्‍यावर ती मला म्‍हणाली, ‘‘तू पूर्णवेळ साधनेचा निर्णय घेतला आहे, तो योग्‍यच आहे. या निर्णयामुळे तुला कधीच पश्‍चात्ताप होणार नाही. उलट या विरुद्ध निर्णय घेतला, तर तुला आयुष्‍यभर केवळ पश्‍चात्तापच होईल.’’ तिने सांगितलेले हे वाक्‍य मला मधे मधे आठवते आणि ‘मी पूर्णवेळ साधना करण्‍याचा जो निर्णय घेतला आहे, तो योग्‍यच आहे’, याची मला जाणीव होते.

१ इ. स्‍वीकारण्‍याची वृत्ती : तिला चुका सांगितल्‍यावर ती शांतपणे त्‍या मान्‍य करते. काही वेळा स्‍वीकारता येत नसेल, तर तेही ती मोकळेपणे सांगते.

१ उ. संताबद्दल भाव

१. ‘पू. भाऊकाका (सनातन संस्‍थेचे १०१ वे (व्‍यष्‍टी) संत पू. अनंत बाळाजी आठवले (वय ८९ वर्षे) आणि सच्‍चिदानंद डॉ. आठवले यांचे ज्‍येष्‍ठ बंधू) म्‍हणजे प.पू. गुरुदेवच आहेत’, या भावाने ती त्‍यांची सर्व सेवा करते.

२. ती करत असलेली सेवा पू. भाऊकाका आणि त्‍यांची पत्नी यांना आवडते. कधी वैदेही सेवेला आली नाही, तर ते तिची विचारपूस करतात.

३. त्‍या दोघांकडून शिकायला मिळालेली सूत्रे ती इतरांना सांगते.

१ ऊ. प्रेमभाव : एका संतांची सेवा मला मिळाल्‍याचे समजल्‍यावर एका साधिकेने वैदेहीला विचारले, ‘‘प्रांजली तुझी मैत्रीण आहे, तर ‘तुला त्‍या संतांची सेवा मिळायला हवी’, असे तुला वाटले नाही का ?’’ त्‍यावर ती म्‍हणाली, ‘‘प्रांजली त्‍या सेवेसाठी योग्‍य आहे आणि ती माझी मैत्रीण आहे, त्‍यामुळे तिला सेवा मिळाली, म्‍हणजे मलाही ती सेवा मिळाली, असेच आहे.’’ या प्रंसगातून तिला माझ्‍याबद्दल हेवा न वाटता माझ्‍यापेक्षाही अधिक आनंद झाला.

गुरुदेवांनी अशी गुणी आध्‍यात्मिक मैत्रीण दिल्‍याबद्दल गुरुचरणी कृतज्ञता !’

२. कु. सुवर्णा श्रीराम 

अ. ‘आम्‍ही खोलीत एकत्र रहातो. वैदेहीताई मला सकाळी आवरण्‍यासाठी साहाय्‍य करते.

आ. मी आजारी असतांना ताई मला जेवण आणणे, औषधे देणे अशी प्रत्‍येक कृती भावपूर्ण करायची. ताई मोठ्या बहिणीप्रमाणे माझी काळजी घेते.

इ. ताई सेवा करतांना माझ्‍याकडून झालेल्‍या चुका तेवढ्याच प्रेमाने आणि तत्त्वनिष्‍ठतेने सांगून मला साहाय्‍य करते.’

३. सौ. साधना भागवत 

अ. ‘ती प्रत्‍येक कृती व्‍यवस्‍थित आणि परिपूर्ण करते. सेवेतील सर्व बारकावे शिकून ती तत्‍परतेने तशी कृती करते.

आ. साधकसंख्‍या अल्‍प असतांना कु. वैदेही कधीही आणि कोणतीही सेवा सांगितल्‍यास आनंदाने स्‍वीकारते आणि ती सेवा पूर्ण करते.’

४. कु. वेदिका भागवत        

अ. ‘वैदेहीताई आश्रमात आल्‍यावर तिने सर्व साधकांशी लवकरच जवळीक साधली. साधकांना तिच्‍याशी बोलतांना आपलेपणा वाटतो.

आ. वैदेहीताईचा भगवान श्रीकृष्‍णाप्रती पुष्‍कळ भाव आहे. सेवेत घडणार्‍या प्रसंगांत ती मनातून देवाचे साहाय्‍य घेते.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : ४.१२.२०२४)