पिंपरी (पुणे) – बेकायदा फलक लावणार्या दोघांवर महापालिकेच्या आकाश चिन्ह आणि परवाना विभागाने दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. ५ व्यावसायिक आणि नागरिक यांच्याकडून ४६ सहस्र ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. शहरातील फलकधारकांकडून नियमांचे उल्लंघन केले जात आहे. (जनतेला शिस्त आणि कायद्याचा धाक नसल्याचा परिणाम ! – संपादक) चौक, मोकळ्या जागा, सीमाभिंत, खांब अशा ठिकाणी बेकायदेशीरपणे फलक लावले होते. त्यामुळे महापालिकेने २७ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत विशेष मोहीम राबवली.