अॅथेन्स (ग्रीस) – पोलंडच्या अनास्ताझा रुबिन्स्का नावच्या एका २७ वर्षीय महिलेचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याच्या आणि नंतर तिची निर्घृण हत्या केल्याच्या प्रकरणी सलाहुद्दीन नावाच्या बांगलादेशी मुसलमानाला येथील न्यायालयने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
१. अनास्ताझा ग्रीक बेटावर बेपत्ता झाल्यानंतर आठवडाभर चाललेल्या अन्वेषणानंतर जून २०२३ मध्ये ग्रीक पोलिसांना तिचा मृतदेह सापडला होता.
२. तिची एका रेस्टॉरंटमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश येथील काही मुसलमानांच्या गटाशी भेट झाली होती. त्यानंतर तिचे अपहरण झाले होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली.
३. निकालानंतर प्रतिक्रिया व्यक्त करतांना अनास्ताझाचे वडील आंद्रेज रुबिन्स्की यांनी सांगितले, ‘ही शिक्षा अनास्ताझाला परत आणणार नाही; परंतु खुन्याला योग्य ती शिक्षा मिळाली आहे. तो पुन्हा कधीही कारागृहातून बाहेर पडू नये आणि त्याला पुन्हा कधीही कोणालाही दुखावण्याची संधी मिळू नये.
संपादकीय भूमिकाबांगलादेशी मुसलमानांच्या कारवायांमुळे केवळ भारताचीच नव्हे, तर जगभरातील लोकांची डोकेदुखी वाढली आहे, याचे हे उदाहरण ! |