मुर्शिदाबाद (बंगाल) – मुसलमानबहुल मुर्शिदाबाद जिल्ह्यातील खैरतळा येथील मामून मुल्ला याच्या घरात देशी बनावटीचे बाँब बनवले जात असतांना झालेल्या स्फोटात ३ जणांचा मृत्यू झाला. ममून मुल्ला, साकिरुल सरकार आणि मुस्ताकीन शेख अशी मृतांची नावे आहेत. रात्रीच्या अंधारात ते घरात बाँब बनवत होते. पोलिसांनी येथून बाँब बनवण्याच्या अनेक वस्तू जप्त केल्या आहेत; मात्र घरावर बाँब फेकण्यात आल्याचे मृताच्या नातेवाइकाचे म्हणणे आहे. पोलीस याचे अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिकाएखाद्या घरात बाँब बनवले जात असताता, हे पोलिसांना, तसेच गुप्तचर विभागाला कसे कळत नाही ? उद्या हे बाँब आतंकवादी कारवायांमध्ये वापरण्यात आले असते, तर काय झाले असते ? असे अन्य घरांमध्ये बाँब बनवले जात आहेत का ?, याचा शोध तृणमूल काँग्रेसचे मुसलमानप्रेमी सरकार घेणार आहे का ? |