देवद, पनवेल येथील सनातनच्‍या आश्रमात गेल्‍यानंतर साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

श्रीमती कांचन वसाने

१. ‘१३.५.२०२४ या दिवशी मी देवद येथील सनातनच्‍या आश्रमात आल्‍यावर मला पुष्‍कळ चैतन्‍य जाणवले.

२. तेथे वास्‍तव्‍याला असतांना आरंभी मला फार जडपणा जाणवत होता; मात्र नंतर माझे शरीर पुष्‍कळ हलके झाले.

३. आश्रमात ‘प्रतिदिन पहाटे उठून नामजप करावा’, असे मला वाटायचे. ‘कुणीतरी मला उठवत असून माझ्‍याकडून नामजप करून घेत आहे’, असे मला जाणवत असे.

४. माझा शारीरिक त्रासही गुरुदेवांच्‍या (सच्‍चिदानंद परब्रह्मडॉ. आठवले यांच्‍या) कृपेने आणि आश्रमातील चैतन्‍याने दूर झाला. माझे मन शांत आणि निर्विचार झाले.

५. मी स्‍वयंपाकघरात सेवा करत असतांना मला मुळीच थकवा जाणवत नसे. ‘गुरुदेव सतत माझ्‍या समवेत आहेत आणि तेच सेवा करून घेत आहेत’, असेच मला जाणवत असे. मी आश्रमात असतांना माझ्‍या क्षमतेपेक्षा अधिक सेवा करू शकले.

एकूणच आश्रमातील चैतन्‍याचा मला लाभ झाला.

गुरुदेवांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्रीमती कांचन जनार्दन वसाने, सासवड, पुणे. (८.६.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक