पुणे – मोहन भागवत आणि भारतीय जनता पक्ष ‘फॅसिस्ट’ (हुकूमशाह) असून हिटलर ही त्यांची प्रेरणा आहे. त्यामुळे ‘समाज वाचवायचा असल्यास तीन मुले जन्माला घाला’, या त्यांच्या विचारावर काय बोलणार ? अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. पुण्यातील कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना चव्हाण यांनी भाजप आणि संघ यांच्यावर टीका केली. मतदान ‘बॅलेट पेपर’वर (मतपत्रिकेवर) घ्यायला हवे; कारण इलेक्ट्रॉनिक यंत्रामधून त्यात जमा झालेली माहिती नष्ट करता येते; मात्र बॅलेट पेपरवर ते शक्य होत नाही. त्यामुळे ‘बॅलेट पेपरवर मतदान करावे’ अशी मागणी केली केली असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. ‘सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी देशातील लोकशाही बळकट करणारा निर्णय देण्याचे टाळले. लोकशाही राज्यव्यवस्था बळकट करण्याची त्यांना संधी होती; मात्र त्यांनी ती घालवली’ अशी टीकाही चव्हाण यांनी केली.