जळगाव – इच्छित सीमा अन्वेषण नाक्यावर नियुक्ती करण्याच्या मोबदल्यात जळगाव प्रादेशिक परिवहन विभागाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील आणि त्यांचा सहकारी भिकन भावे यांना ३ लाख रुपयांची लाच घेतांना छत्रपती संभाजीनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. पाटील यांचे दोन महिन्यांपूर्वी कोल्हापूर येथून जळगाव येथे स्थानांतर झाले होते. दीपक पाटील यांच्या कोल्हापूर, ठाणे, सांगली, नगर येथील घरांची माहिती घेण्याचे काम चालू आहे, अशी माहिती अन्वेषण अधिकार्यांनी दिली. (इतक्या मोठ्या पदावरील अधिकारी जर लाच घेत असेल, तर विभागातील खालच्या कर्मचार्यांवर वचक तो काय रहाणार ? त्यातून अटक झाली, तरी प्रत्यक्ष शिक्षा होईपर्यंतची प्रक्रिया वेळखाऊ आहे, यातील बहुतांशांना शिक्षा झाल्याचे विशेष ऐकिवात येत नाही. अशा प्रकरणांना आळा घालण्यासाठी तात्काळ आणि कठोर शिक्षेचे प्रावधान आवश्यक आहे ! – संपादक)