मुंबई – चतुरंग, ब्राह्मण सभा, ब्राह्मण सेवा मंडळ, मुंबई मराठी साहित्य संघ अशा गिरगाव येथील प्रसिद्ध संस्थांचे पदाधिकारी आणि गिरगावमधील प्रसिद्ध निवासी हॉटेल ‘माधवाश्रम’चे संस्थापक, मालक रमेश महाजन (वय ८४ वर्षे) यांचे ५ डिसेंबर या दिवशी सकाळी ६.३० वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई, नातू असा परिवार आहे. अनेक कलाकारांशी त्यांचे ऋणानुबंध होते. त्यांच्या कार्यासाठी दादर येथे अलीकडेच झालेल्या ‘चतुरंग सुवर्ण महोत्सवा’मध्ये त्यांना सन्मानित करण्यात आले होते.