संपादकीय : शेजारधर्म हिंदूंनीच का पाळावा ?

उत्तरप्रदेशातील मुरादाबाद येथील एका वसाहतीतील डॉ. बजाज नावाच्‍या व्‍यक्‍तीने स्‍वतःचे घर डॉ. इकरा चौधरी यांना विकल्‍यामुळे या वसाहतीतील हिंदूंनी संताप व्‍यक्‍त करत आंदोलन चालू केले आहे. ‘या वसाहतीमध्‍ये हिंदूंनाच सदनिका खरेदी करण्‍याची अनुमती मिळावी, अन्‍य धर्मियांना येथे स्‍थान देऊ नये’, अशी अट हिंदूंनी घातली होती. त्‍यामुळे डॉ. इकरा यांना सदनिका विकल्‍यामुळे हिंदू हा करार रहित करण्‍यासाठी प्रयत्न करत आहेत. ‘हिंदूबहुल भागांत मुसलमानांना स्‍थान नाही’, असा निश्‍चय हिंदूंमध्‍ये होतांना दिसत आहे. त्‍यामुळेच ‘हिंदूंच्‍या वस्‍त्‍यांमधील सदनिकेमध्‍ये मुसलमान भाडेकरू ठेवण्‍यास नकार’ किंवा ‘हिंदूंच्‍या वस्‍त्‍यांमध्‍ये मुसलमानांना घर विकण्‍यास नकार’, अशा आशयाच्‍या बातम्‍या आपल्‍याला अधूनमधून वाचायला मिळतात. अशा बातम्‍यांना वृत्तपत्रे किंवा सामाजिक माध्‍यमे आदी माध्‍यमांतून भरघोस प्रसिद्धी मिळते. निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांच्‍या टोळ्‍याही या घटनांनंतर सक्रीय होतात. ‘हिंदूंमध्‍ये असहिष्‍णुता आणि धर्मांधता वाढली आहे’, अशा प्रकारचे टोमणे मारून ‘गरीब बिचार्‍या मुसलमानांना भारतात रहाणे किती कठीण झाले आहे’, याचा पाढा वाचला जातो. या घटनांची नोंद केवळ भारतातीलच नव्‍हे, तर जगभरातील हिंदुद्वेष्‍टी आणि भारतद्वेष्‍टी प्रसारमाध्‍यमे घेतात. अशा घटनांचा वापर हिंदूंची आणि त्‍याही पुढे जाऊन भारताची प्रतिमा मलीन करण्‍यासाठी होतो. वास्‍तविक सहिष्‍णु, शेजारधर्म पाळणारे हिंदू ‘सध्‍या असे टोकाचे पाऊल का उचलत आहेत ?’, याचा विचार मात्र कुणीही करतांना दिसत नाही.

सध्‍या धर्मांध मुसलमानांमधील वाढती आक्रमकता आणि धर्मांधता यांमुळे भारतातील हिंदूंमध्‍ये भीतीचे वातावरण आहे. भारतात कुठेही हिंदूंच्‍या यात्रा, मिरवणुका किंवा धार्मिक कार्यक्रम असले, तर त्‍याच्‍यावर धर्मांधांच्‍या आक्रमणाचे सावट असते. ही अतिशयोक्‍ती नसून सत्‍य परिस्‍थिती आहे. हिंदूंच्‍या वसाहतीमध्‍ये एका धर्मांधाला प्रवेश दिल्‍यास पुढे तीच व्‍यक्‍ती उदामपणे हिंदूंना त्रास देऊन तेथे त्‍याच्‍या धर्मबांधवांना वसवण्‍याचा प्रयत्न करते. पुढे आक्रमक कारवाया करून हिंदूंना त्‍या परिसरातून अक्षरश: हाकलून लावते. अशा घटना उत्तरप्रदेश, राजस्‍थान या राज्‍यांत, तसेच महाराष्‍ट्रातही घडल्‍या आहेत. त्‍यामुळे ‘स्‍वतःची आणि स्‍वतःच्‍या कुटुंबाची सुरक्षा कशामध्‍ये आहे ?’, याची हिंदूंना जाणीव होऊ लागली आहे. ‘एक हैं, तो सेफ हैं ।’ (संघटित असलो, तरच सुरक्षित राहू) या भावनेतून हिंदू असे निर्णय घेत आहेत. त्‍यामुळे कुणाला पोटशूळ उठण्‍याचे कारण काय ? हिंदूंवर फुकाचे आरोप करून त्‍यांना आरोपीच्‍या पिंजर्‍यात उभे करणारे कधी ‘हिंदूंवर असे निर्णय घेण्‍याची वेळ का आली ?’, याचा विचार करत नाहीत. धर्मांध मुसलमान लँड जिहाद, लव्‍ह जिहाद करणार, हिंदूंच्‍या सणांच्‍या वेळी त्‍यांच्‍यावर आक्रमणे करणार, तरीही त्‍यांना समाजामध्‍ये सामावून घेण्‍याचा सल्ला हिंदूंना का दिला जातो ? समाजात एकोपा निर्माण करण्‍याची भाषा करणार्‍यांनी या सूत्रांचा अभ्‍यास करून यावर उपाययोजना काढली, तरच समाजाचे भले होईल.

हिंदूंच्‍या सहिष्‍णु वृत्तीचा अपलाभ घेणार्‍या धर्मांधांना जाब विचारण्‍याची बुद्धी निधर्मीवाद्यांना का होत नाही ?