‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अधिवक्ता रवींद्र घोष यांना पोलिसांकडूनच धमकी

हिंदु कुटुंबांना कायदेविषयक साहाय्य न करण्याची तंबी !

चित्तगाँग (बांगलादेश) – बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक हिंदु कुटुंबांवर होणार्‍या अत्याचाराला सतत वाचा फोडणारे ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अधिवक्ता रवींद्र घोष यांना चित्तगाँग शहर पोलीस आयुक्त महंमद इक्बाल बाहर यांनी धमकी दिली. ‘अधिवक्ता घोष यांनी पोलीस अन्वेषणात हस्तक्षेप करू नये, तसेच हिंदु कुटुंबांना कायदेविषयक साहाय्य करू नये’, अशी तंबी महंमद बाहर यांनी दिली आहे. धर्मांधांकडून अल्पसंख्यांक हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांच्या प्रकरणी हिंदूंना सुरक्षा पुरवण्याऐवजी पोलीस धर्मांधांनाच साहाय्य करत असल्याचा अन्यायकारक प्रकार येथे पहावयास मिळत आहे.

चित्तगाँगच्या मुरदपूर येथील काही धर्मांधांकडून हिंदु कुटुंबियांची भूमी बळकावण्यासाठी त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत. ‘या धर्मांधांच्या विरोधात न्यायालयात खटले दाखल करण्यात आले; मात्र पोलीस त्यांच्या विरोधात कारवाई करण्यास दिरंगाई करत आहेत’, असा आरोप येथील हिंदूंनी केला. या हिंदु कुटुंबातील एका मुलीवर धर्मांधांनी लैंगिक अत्याचार केले; मात्र त्याविषयी तक्रार प्रविष्ट करून घेण्यास पोलिसांनी नकार दिला. शेवटी हिंदु कुटुंबियांनी ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अधिवक्ता रवींद्र घोष यांना साहाय्य करण्याची विनंती केली. अधिवक्ता घोष यांनी चित्तगाँग शहर पोलीस आयुक्त महंमद इक्बाल बाहर यांच्याशी दूरभाषवरून संपर्क साधला आणि हिंदूंवरील अत्याचारांविषयी चौकशीची मागणी केली. त्यावर संतप्त झालेल्या पोलीस आयुक्तांनी अधिवक्ता घोष यांना उद्दामपणे धमकावले.

मानवाधिकार संघटनांनी अल्पसंख्यांक हिंदूंना न्याय मिळवूनद्यावा ! – अधिवक्ता रवींद्र घोष

बांगलादेशमधील अल्पसंख्यांक हिंदूंना मानवाधिकार संघटनांनी न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी अधिवक्ता रवींद्र घोष यांनी केली. (जे सरकार भारतातील हिंदूंचे रक्षण करू शकत नाही, ते बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण कसे करणार ? बांगलादेशमधील हिंदूंना भारत सरकारकडून काहीही साहाय्य मिळण्याची अपेक्षा नाही, हेच सिद्ध होते. यासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला पर्याय नाही ! – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now