मुंबई, ६ डिसेंबर (वार्ता.) – महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत ‘एक हैं तो, सेफ हैं’ (एकत्र असलो, तर सुरक्षित राहू) हे घोषवाक्य महायुतीला बहुमत मिळवून देणारे ठरले आहे. या घोषवाक्याला प्राप्त होत असलेला उदंड प्रतिसाद पहाता मंत्रालयाच्या बाहेरील बसथांब्यावर ‘एक हैं तो, सेफ हैं’ या वाक्याचा डिजीटल फलक लावण्यात आला आहे. हा डिजीटल फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.