पुणे – बंडगार्डन पोलिसांनी पुणे रेल्वेस्थानक परिसरात ३ डिसेंबर या दिवशी मुसलमिया अब्दुल अजीज प्यादा या बांगलादेशी घुसखोर तरुणीला पकडले आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई भाग्यश्री सागर यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मुसलमियावर गु्न्हा नोंद करण्यात आला आहे. तिच्याकडे पारपत्र, तसेच भारतात प्रवेश करण्याबाबतची अधिकृत कागदपत्रे नव्हती. दलालाच्या मध्यस्थीने तिने भारतात अवैधरित्या प्रवेश केल्याचे उघडकीस आले आहे. मुसलमियाने भारतात का प्रवेश केला ? तसेच तिला पुण्यात कुणी आणले ? यादृष्टीने अन्वेषण करण्यात येत आहे.
संपादकीय भूमिका :बांगलादेशी घुसखोरांची वाढती संख्या, आतंकवाद्यांच्या कारवाया यांमुळे सामान्य नागरिकांसाठी असुरक्षित बनलेले पुणे ! बांगलादेशी घुसखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी सरकारने कायद्याची कठोर कार्यवाही करणे अपेक्षित आहे. |