Bangladesh’s Muhammad Yunus : खटल्यांची सुनावणी पूर्ण झाल्यावर भारताकडे शेख हसीना यांचे प्रत्यार्पण करण्याची मागणी करणार – महंमद युनूस, बांगलादेश

बांगलादेशाच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार महंमद युनूस यांचे विधान

डावीकडून महंमद युनूस आणि शेख हसीना

ढाका (बांगलादेश) – शेख हसीना यांनी त्यांच्या १५ वर्षांच्या कार्यकाळात देशातील सरकारी यंत्रणा पूर्णपणे उद्ध्वस्त केली. देशात लोकशाही आणि आर्थिक स्थैर्य यांची पुनर्बांधणी करण्याचे आपल्यावर मोठे दायित्व आहे, असे विधान बांगलादेशाच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार महंमद युनूस यांनी केले आहे. ते ‘निक्केई एशिया’ या जपानी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. ‘हसीना यांच्या खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर आम्ही अधिकृतपणे भारताकडे त्यांच्या प्रत्यार्पणाची मागणी करू’, असेही ते म्हणाले. सध्या शेख हसीना भारतात रहात आहेत. युनूस यांनी सध्या बांगलादेशात निवडणुका होण्याची शक्यता फेटाळून लावली आहे.

युनूस यांनी बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांविषयी भारत सरकारची चिंता निराधार आणि अपप्रचार असल्याचे म्हटले आहे. (यातून महंमद युनूस यांची मानसिकता लक्षात येते ! – संपादक)

संपादकीय भूमिका

बांगलादेशात सध्या हिंदूंवर होत असलेल्या आक्रमणांच्या विरोधात महंमद युनूस यांच्यावर भारतात गुन्हे नोंदवून त्यांच्या प्रत्यार्पणाची मागणी भारताने केली पाहिजे !