विरोधकांच्या हत्या होणे, हे देशाच्या प्रतिष्ठेसाठी घातक ! – मुंबई उच्च न्यायालयाचे मत

डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे हत्या प्रकरणाची सुनावणी

मुंबई – स्वतंत्र विचार आणि विरोधी मते मांडणारे यांच्याविषयी आदर ठेवण्याऐवजी त्यांना ‘लक्ष्य’ करण्याचा प्रकार होत असून ते अत्यंत धोकादायक आहेत; परंतु देशाची प्रतिमा आणि प्रतिष्ठा यांच्यासाठीही घातक आहे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस्.सी. धर्माधिकारी आणि न्यायाधीश भारती डांगरे यांच्या खंडपिठाने व्यक्त केले. डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणाची सुनावणी १२ ऑक्टोबरला झाली. डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या पाठोपाठ साहित्यिक एम्.एम्. कलबुर्गी आणि नुकतीच पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाली. त्या अनुषंगाने खंडपिठाने वरील मत व्यक्त केले.

१. या वेळी डॉ. दाभोलकर हत्येचे अन्वेषण करणारा केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि कॉ. पानसरे हत्येचे अन्वेषण करणारे विशेष अन्वेषण पथक यांनी न्यायालयात तपासाचे प्रगती अहवाल सीलबंद लिफाफ्यात सादर केले.

२. ते पाहिल्यानंतर खंडपिठाने सांगितले की, तुमचे प्रामाणिक प्रयत्न चालू असले, तरी हत्यांमागचे मुख्य सूत्रधार मोकाट आहेत. त्यामुळे तपासाचे ठोस निकाल लवकर दिसायला हवेत.

३. अन्वेषण यंत्रणांकडून सनातन संस्थेची चौकशी होत नसल्याचे म्हणणे डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे कुटुंबियांच्या वतीने अधिवक्ता अभय नेवगी यांनी मांडले; मात्र खंडपिठाने त्यावर नकार दर्शवला. या वेळी खंडपिठाने स्पष्ट सांगितले की, अन्वेेषणातील गोष्टी आम्ही उघड करू शकत नाही; परंतु अहवाल पाहिल्यानंतर अन्वेषण यंत्रणा सर्व दिशांनी अन्वेषण करत असल्याचे आम्ही सांगू शकतो आणि त्यांनी सनातन संस्थेच्या शक्यतेकडेही दुर्लक्ष केलेले नाही.

(संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स आणि सामना)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now